Saturday, 7 April 2018

सोशल मिडिया

           आज इंटरनेटच्या माध्यमातून जग हे वैश्विक खेड बनल आहे. देशादेशातील अंतर यामुळे कमी झाले आहे.माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यापुढे जावून संवाद साधण्यासाठी सोशल नेट्वर्किंग साईटचि उपयुक्तता मोठ्या गतीने वाढत चालली आहे व्हाटसप, फेसबुक,गुगल प्लस, ट्विटर अश्या सोशल साईटचा वापर वाढत चालले आहे.ही माध्यमे स्वस्त आणि हाताळण्यास साहज उपलब्ध होवू लागले आहेत.जगात करोडो लोक सोशल मिडीयाचा वापर माहिती आणि विचार आदान प्रदान करण्यासाठी वापरतात तसेच संपर्क वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर केला जातो. सुरुवातीच्या काळात इंटरनेट फक्त संगणकावर उपलब्ध होते त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर जास्त प्रमाणात झाला नाही. परंतु आता मोबाईल, टँबलेट,नेटपँड अश्या साधनांचा वापर वाढल्यामुळे त्या साधनांच्या सहाय्याने सोशल मिडीयाचा वापर  अधिक प्रमाणात वाढला आहे.
         सोशल मिडिया हा शब्द आता समाजात सर्वांगीण झालेला आहे सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामान्य माणूसही आता संवादाचे आदान प्रदान करत आहे. सोशल मिडीया हा इंटरनेटच्या माध्यमातून वापरला जातो. व्हाटसप, फेसबुक,गुगल प्लस, ट्विटर, टेलिग्राम ही अँपलीकेशन देखील सोशल मिडीया या संवाद माध्यमात मोडतात. या सोशल मिडीयाचा पहिला प्रयोग विसाव्या शतकात 1990 ला झाल्याची नोंद आहे त्यानंतर 1994 साली निर्माण करण्यात आलेली जिओ सिटीज ही पहिली सोशल मिडिया साईट होती. जीओसिटीज प्रमाणे सोशल मिडीयाच्या क्षेत्रात पुढे नवनवीन क्रांती घडत गेली. मात्र खरी क्रांती ही 2004 साली फेसबुक सुरु झाल्यापासून झाली. फेसबुक नंतर ट्विटर,गुगल प्लस,ब्लॉग, युट्युब अशी विविध सामाजिक माध्यमे आली. या माध्यमातून सर्व जग एकत्र येईल अशी संकल्पना आहे.सोशल मिडीयाला सामाजिक,धार्मिक,राजकीय,सांस्कृतिक अश्या कोणत्याही सीमा नसल्यामुळे सोशल मिडीयाचा उपयोग करून विविध क्षेत्रात यश संपादन करता येते.
          वृत्तपत्रात एखादी माहिती किंवा जाहिरात दिली तर ती आज असते उद्या त्याची किमत शून्य असते शिवाय जी माहिती किंवा  जाहिरात दिली त्या दिवशी ती किती लोकांनी पाहिली हे मोजता येत नाही.पण सोशल मिडीयामध्ये तसे नाही इथे तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ट्रँक करता येते.तुम्हाला कोणत्या वेळेला हिट,लाईक जास्त मिळतात, कोणत्या भागातून किती लोक तुमच्या वेबसाईटवर जात आहेत हे सर्व सोशल मीडियाद्वारे करू शकतो.सोशल मिडिया हे आधुनिक मध्यम असून त्यात दररोज नवनवे बदल होत असतात.त्यामुळे सोशल मिडीयावर रोज अद्यावत राहावे लागते.

No comments:

Post a Comment