
ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रोस हि
संस्था जगातील अनेक राष्ट्रांमध्ये ‘स्मार्ट सिटी चँलेंज कॉम्पिटीशन’ घेत असते
भारतातही या कंपनीच्या वतीनं स्पर्धा घेवून शहरांची निवड करण्यात आली. देशातील 100
शहरांना विकसित करण्याचे भारत सरकारचे स्थायी स्वरुपात उदिष्ट ठेवण्यात आले.
स्मार्ट सिटीत सहभागी
होण्यासाठी शहरांना राज्य व केंद्र सरकार असे
दोन टप्यातील स्पर्धेचे आव्हान पार करावे लागणार असे धोरण ठरवण्यात
आले.राज्य सरकारचा टप्पा पार केल्यानंतर स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र
सरकारच्या परीक्षेचे आव्हान पूर्ण करावे लागणार. ‘स्मार्ट सिटी’ साठी प्रत्येक
शहराने स्वतंत्र प्रकल्प आराखडा सादर करणे,विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी
निधी उभारनिसह त्याचा विनियोग कसा केला जाईल याचे स्पष्टीकरण देणे,पाणीपुरवठा,
कचरा व्यवस्थापन, वाहतूक उर्जेचा वापर आणि ई-गव्हर्नस अश्या कोणत्याही शहरातील पाच
मुलभूत घटकांचा विकास ठरवावे आणि त्यानुसार नागरिकांसाठी कोणत्या सेवा सुविधा
उपलब्ध करून भर देण्यात येतील याचा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात यावे.
शहरांकडून पाठीवण्यात आलेल्या प्रकल्प अहवालाची सविस्तर छाननी करून त्यानंतरच स्मार्ट
सिटी प्रकल्पासाठी अंतिम मान्यता मिळू शकेल असे धोरण ठरवण्यात आले.
यात पहिल्या टप्प्याचा निकष
म्हणून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 100 संभाव्य शहरांची नामांकने
केली.शहरांनी स्मार्ट सिटी म्हणून पाठवलेल्या विकासाच्या नियोजनाचे मुल्यांकन नागरी
विकास मंत्रालयाच्या सर्वोच समितीने केले आणि त्यातून गुणांवर आधारित शहरांची विविध टप्प्यांद्वारे निवड करण्यात आली.
- सिटीत निवड झालेल्या शहरांची यादी
राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे नाव
|
निवडलेल्या शहरांची नावे
|
महाराष्ट्र
|
बृहन्मुंबई, ठाणे , कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई,नाशिक, अमरावती,
सोलापूर, नागपूर, पुणे,
औरंगाबाद
|
पश्चिम बंगाल
|
न्यू टाऊन कोलकाता, बिधाननगर, दुर्गापूर,
हल्दिया
|
गुजरात
|
गांधीनगर, अहमदाबाद , सूरत,
वडोदरा, राजकोट, दाहोद
|
मध्य प्रदेश
|
भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर,
जबलपूर, सतना, उज्जैन,
सागर
|
तमिळनाडू -
|
कोइंबतूर, चेन्नै, मदुरै,
तिरुचिरापल्ली, वेल्लूर, सेलम,
इरोड, तिरूपुर, तंजावूर ,
तिरूनरवली, दिंडुक्कल, तूतुकूडी,
|
कर्नाटक
|
, बेळगाव,
शिमोगा, हुबळी- धारवाड , तुमकूर,दावणगेरे
|
केरळ
|
कोची
|
तेलंगण
|
वारंगळ, करीमनगर
|
आंध्रप्रदेश
|
विशाखापट्टणम, तिरूपती, काकीनाडा
|
उत्तर प्रदेश
|
मोरादाबाद, अलीगढ, सहारनपूर,
बरैली, झांसी, कानपूर,
अलाहाबाद,लखनौ, वाराणसी,
गाझियाबाद, आग्रा, रामपूर
|
राजस्थान
|
जयपूर , उदयपूर , कोटा ,
अजमेर
|
पंजाब
|
लुधियाना , जलंधर , अमृतसर
|
बिहार
|
मुझफ्फरपूर , भागलपूर , बिहार शरीफ
|
हरियाणा
|
करनाल , फरीदाबाद
|
आसाम
|
गुवाहाटी
|
ओडिशा
|
भुवनेश्वर, रूरकेला
|
हिमाचल प्रदेश
|
धरमशाला
|
उत्तराखंड
|
डेहराडून
|
झारखंड
|
रांची
|
सिक्किम
|
नामची
|
मणिपूर
|
इम्फाल
|
अंदमान आणि निकोबार
|
पोर्ट ब्लेअर
|
अरुणाचल प्रदेश
|
पासीघाट
|
चंदिगढ
|
चंदिगढ
|
छत्तीसगढ
|
रायपूर ,बिलासपूर
|
दादरा आणि नगर- हवेली
|
सिल्वासा
|
दमण आणि दीव
|
दीव
|
दिल्ली
|
दिल्ली
|
गोवा
|
पणजी
|
लक्षद्वीप
|
कवरती
|
मेघालय
|
शिलाँग
|
मिझोराम
|
ऐझॉल
|
नागालँड
|
कोहिमा
|
पुदुच्चेरी
|
औल्गरेत
|
त्रिपुरा
|
अगरतला
|
No comments:
Post a Comment