पू.ल.देशपांडे म्हणतात कि,ज्याला शंभर किलो धान्याच पोत उचलता येत त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येत त्याला त्याला उचलता येत नाही. इथे प्रश्न शक्तीप्रदर्शनाचा नाही तर गरिबी श्रीमंतील आहे. 'सबका साथ सबका विकास' या धोरनेवर समाजातील सर्व लोकांचा विकास करणार असे घोषणा ऐकू येत आहेत.परंतु ऑक्सफँम या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये गरीब श्रीमंतामध्ये असलेली दरी यावर प्रकाश पाडला आहे.स्वित्झर्लंडमधील दावोस शहरमधील परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफँम या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला या अहवालात असे सांगितले आहे की एकट्या भारतात 1% अब्जाधीशकडे देशातील 5.8 टक्के संपत्ती एकवटली आहे. दरवर्षी वाढच होत आहे तर कामगारांच्या वेतनात दोन एक टक्क्यांनी वाढ होत नाही. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब अधिक गरीब होत आहेत.
गरीब-श्रीमंतांमधील ही आर्थिक विषमतेची दरी जीवन संपेल का हाच खरा प्रश्न आहे.
प्रिया लगशेट्टी.
प्रिया लगशेट्टी.
No comments:
Post a Comment